Join us

नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी खालावली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 9:41 AM

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचले आहे. परिणामी निरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने घटत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नातेपुते : राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचले आहे. परिणामी निरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने घटत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणांमधील पाण्याचा साठा घटताना दिसून येत आहे. परिणामी, आगामी काळात पाण्याचे प्रमाण कमी होऊन तीव्र पाणीटंचाई झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि पशुधनाच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर येणार अशी भीती व्यक्त होत आहे.

नीरा खोऱ्यातील धरणातील साठा संपण्याच्या मार्गावर

  • ब्रिटिशकालीन भाटघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी नीरा देवघर व भाटघर धरणे १०० टक्के भरली होती. नीरा देवघर धरणात १२ टीएमसी, तर भाटघर धरणात २४ टीएमसी पाणीसाठा होता.
  • सध्या भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा राहिला आहे. मागील वर्षी धरणात १८ टक्के पाणीसाठा होता, तर निरादेवघर धरणात १९ टक्के पाणीसाठा असून, धरणातून २३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्के पाणीसाठा कमी आहे.
  • गुंजवणी धरणात २८ टक्के पाणीसाठा असून, धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडले आहे, तर मागील, वर्षी धरणात ४० टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच धरणात १२ टक्के साठा कमी आहे, तर वीर धरणात सध्या ३८ टक्के साठा असून, मागील वर्षी ४७ टक्के पाणीसाठा होता. मागच्या तुलनेत नऊ टक्के साठा कमी आहे. तीनही धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीसाठा कमी राहिला आहे.

अधिक वाचा: या ब्रिटिशकालीन धरणात सध्या इतका टक्के पाणीसाठा शिल्लक

टॅग्स :धरणपाणीनदीपाऊसदुष्काळमहाराष्ट्र