राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असून धाराशिव जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून धरणसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. धाराशिव जिल्ह्याचे सर्वाधिक क्षमतेचे निम्न तेरणा धरणात आता १३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी निम्न तेरणात ३३.१२ टक्के पाणीसाठा होता.
धाराशिव जिल्ह्यात लहान मध्यम व मोठी अशी एकूण ९ धरणे आहेत. सध्या होत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी बऱ्याच धरणांमध्ये अजूनही शुन्य टक्केच पाणीसाठा आहे.
धाराशिव शहराला ज्या उजनी धरणातून पाणीसाठा होतो, त्या धरणात अजूनही शुन्यच पाणीसाठा आहे. १५१७.२० उपयुक्त पाणीसाठा असणाऱ्या धरणात आता १०६९.७८ टक्के एकूण पाणीसाठा आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा आहे धाराशिव जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा