उजनी धरणाला पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाते. यामध्ये पुणे जिल्ह्याचा काही भाग तर संपूर्ण सोलापूरसाठी पिण्याचे पाणी, शेतीचेपाणी, उद्योगांची तहान उजनीतून भागविली जाते.
उजनी धरणाची एकूण क्षमता ११५ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सहसा पाण्याची समस्या निर्माण होत नाही. यंदा एप्रिलमध्ये हाच पाणीसाठा वजा ४० टक्क्यांपर्यंत खालावला आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची, शेतीची तहान वाढत आहे.
अपुऱ्या पावसाअभावी यंदा मार्च/एप्रिलमध्येच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला असतानाच संभाव्य पाणीटंचाईमुळे बारामती एमआयडीसीमधील उद्योजक अपुऱ्या पावसाअभावी यंदा मार्च/एप्रिलमध्येच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट झाला आहे.
त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला असतानाच संभाव्य पाणीटंचाईमुळे बारामती एमआयडीसीमधील उद्योजक चांगलेच धास्तावले आहेत. सध्याचा पाणीसाठा पाहता बारामती औद्योगिक क्षेत्राला कसाबसा महिनाभर सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.