Lokmat Agro >हवामान > Konkan Rainfall आगामी चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Konkan Rainfall आगामी चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

There is a possibility of heavy rain in Sindhudurg district for the next four days | Konkan Rainfall आगामी चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Konkan Rainfall आगामी चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय सिंधु नगरी येथे नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून टोल फ्री क्रमांक १०७७ मोबाइल क्रमांक ७४९८०६७८३५ व दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८४७ या नंबर वर आपत्कालीन सिरीज संपर्क साधावा. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालया ठिकाणी ही नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.

या काळात मुसळधार पाऊस तसेच पन्नास ते साठ किलोमीटर वेगाचे वारे वाहणार असून विजा चमकण्याचे प्रमाण मोठे असणार आहे. याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, सर्व मत्स्य सहकारी संस्था, नौका मालक, मासेमार बांधव यांना कळविण्यात येते की, ७ ते ११ जून या कालावधीत ३५ ते ४५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग ५५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तरी यांत्रिक व यंत्रचलित नौकांनी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे पालन करावे.

समुद्रात, खाडी क्षेत्रात मासेमारीस जाऊ नये
बिगर यांत्रिकी नौकांनीदेखील या कालावधीत खाडी क्षेत्रात अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारे सह पावसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

अधिक वाचा: Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया

Web Title: There is a possibility of heavy rain in Sindhudurg district for the next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.