Join us

गुढीपाडव्याला जायकवाडी धरणात केवळ एवढं पाणी शिल्लक

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 09, 2024 1:48 PM

मराठवाड्यातील शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आज गुढीपाडव्यादिवशी १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ५२.३६ ...

मराठवाड्यातील शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आज गुढीपाडव्यादिवशी १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ५२.३६ टक्के एवढा होता.

राज्यात तापमान वाढत असून धरणसाठा वेगाने खालावत आहे. सहा विभागातील मराठवाडा विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असून तोही १८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणात ३९१ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळ्याला साधारण दोन महिने शिल्लक असताना नाथसागरातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. आज सकाळी ८.३० वाजता जायकवाडी धरणात १३ टीएमसी पाणी शिल्लक होते.

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला. कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी घटली आहे. नदीसह बंधारे कोरडेठाक पडले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या परळी थर्मलसाठी पाणी सोडण्यात आले आहे. थर्मलचे पाणी आटोपल्यानंतर ढालेगाव बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे; मात्र नेमके केव्हा पाणी येणार याबाबत जायकवाडी विभाग अनभिज्ञ असून एप्रिलच्या शेवटी पाणी दाखल होईल अशी शक्यता आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीधरण