Lokmat Agro >हवामान > ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

This drought affected taluka fall more rain than Mahabaleshwar | ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे.

माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवनाथ जगदाळे
दहिवडी : माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊसमाण तालुक्यात पडला आहे.

विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांत प्रथमच असे घडले असून, माणमधील पावसाचे प्रमाण हे पंधरवड्यातील सरासरीच्या ३३२ टक्के इतके आहे.

माण तालुका मागील काही महिन्यांपासून दुष्काळाशी झुंज देत आहे. ऐन उन्हाळ्यात तर भीषण पाणी टंचाईचा सामना करताना सामान्य ग्रामस्थांसह प्रशासन मेटाकुटीस आले होते. टँकरद्वारे मोठ्या लोकसंख्येला तसेच जनावरांना पाणी पुरवताना अडचणींचा डोंगर उभा राहत होता.

सर्वजण वळवाकडे आस लावून बसले होते; पण एप्रिल व मे महिन्यांत म्हणावा असा वळीव झाला नाही. त्यामुळे सर्वजण पावसाची चातकासारखी वाट बघत होते.

जून महिन्यात माण तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात होत असते. आणि तोही पडला तर पडला नाही तर बहुतांशी वेळा जून पावसाच्या प्रतीक्षेतच जातो मुसळधार पाऊस अन तोही जून महिन्यात अनेकांनी गेली कित्येक वर्षे पाहिलेला नाही काहींना तर आठवतही नाही. मात्र यंदाचा जून माणसाठी काही वेगळाच आहे.

साधारण ५ जूनला पावसाने माण तालुक्यात दमदार आगमन केले. त्यानंतर त्याने न भूतो असा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. ५ जूनपासून आजपर्यंत अपवाद वगळता दररोज थोडा का होईना पाऊस पडतोय. त्यातही अनेकदा दमदार स्वरूपाचाच पाऊस पडतोय. सातत्याने पडत असलेल्या या दमदार पावसाने मोकळ्या शेतशिवारांना तळ्यांचे स्वरुप आले आहे.

प्रमाणापेक्षा जास्त पाणी साठल्याने ताली फुटल्या आहेत. काही ठिकाणी शेतं वाहून गेली आहेत. ओढ्या, नाल्यांना पूर आल्याने सिमेंट बंधारे भरभरून वाहू लागले आहेत. तर पाझर तलावांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

तळ गाठलेल्या विहिरी काठोकाठ भरण्याच्या तयारीत आहेत. या पावसाने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. सध्या माण तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या तयारी सज्ज झाला आहे.

आजपर्यंत १९५.१ मिलिमीटर पाऊस
माणमध्ये १ ते १७ जूनपर्यंत सामान्यपणे ५९.६ मिलीमीटर पाऊस पडतो; पण प्रत्यक्षात यंदा या कालावधीत एकूण १७ दिवसांपैकी सरासरी ९ दिवस पाऊस पडला असून, आजपर्यंत १९५.१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सामान्य पावसाच्या ३२७.५ टक्के इतका आहे. या उलट महाबळेश्वर मध्ये ५२०.५ मिलीमीटर अपेक्षित असताना फक्त १८६.७ मिलीमीटर पडला असून, टक्केवारी सामान्य पावसाच्या फक्त ३५.९ टक्के इतकी आहे.

माणमध्ये १ ते १७ जूनपर्यंतचा पाऊस (मि.मी.)

मंडलआजपर्यंत पडलेला पाऊसकिती दिवस पाऊस पडला
दहिवडी१८८.२११
मलवडी२७८.६११
गोंदवले बुदुक२१३.७११
कुक्कुडवाड१३९.५
म्हसवड१४६.८
मार्डी१९५.३११
शिंगणापूर२०४.४१०

अधिक वाचा: Kharif Sowing राज्यात पेरण्या केवळ १२ टक्केच, कुठे झाली किती पेरणी?

Web Title: This drought affected taluka fall more rain than Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.