संतोष कुंडकर यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याने मान्सून ९० टक्केच राहणार असण्याची अभ्यासकांनी वर्तविली आहे. मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला तरी १० जुलैनंतरच मान्सून ताकदीने सक्रिय होईल, असे या अभ्यासकांना वाटते. मात्र, येणारा पाऊस हा कमी दिवसांत जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे. कृषी विभाग आणि कृषीतज्ज्ञांनी सांगूनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
सध्याचे हवामानअल निनोच्या प्रभावामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढलेले आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. पुढील चार दिवस वाऱ्याची चक्राकार स्थिती उत्तर प्रदेश आणि गुजरातवर आहे. परंतु आनंदाची बाब म्हणजे पुढील काही दिवसांत शक्यता बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्रात पाऊस होईल. सध्या आकाशात ढगांनी गर्दी होत असली तरी जमिनीवर पुरेसे तापमान, हवेचा दाब, आणि आर्द्रता नाही.
यावर्षी मान्सून २२ जूननंतर महाराष्ट्रात दाखल झाला. परंतु तो पुढे गायब होणार, असा अंदाज २०१६ अभ्यासकांनी व्यक्त केला होता आणि तो तंतोतंत खराही ठरला. गेल्या अनेक २०१८ वर्षांपासून असे घडत आहे. सध्या पावसाने दडी मारली असून पूर्व-मध्य महाराष्ट्रात पाऊस येण्यासाठी लागणारी स्थिती मात्र नाही. येत्या काही दिवसांत बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतरच महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून वणी भागात पावसाचे ढग येतात आणि वाऱ्यासोबत निघून जातात. अख्खा जून महिना कोरडा गेल्याने पिके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यताया वर्षीच्या पावसावर अल निनोचे अल्पसे सावट राहणार आहे. सध्या आकाशात ढग दिसत असले तरी जमिनीवर योग्य तापमान, हवेचा दाब आणि आर्द्रता नसल्याने पाऊस पडत नाही. तसेही गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवातीला मान्सून हा विक असतो आणि जुलै, ऑगस्टमध्येच तो सक्रिय आहे. यावर्षी जरी चांगला पाऊस झाला तरी कमी दिवसांत स्व घटना वाढतील आणि पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबेल, अशी शक्यता आहे.- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक.
अल निनोचा प्रभावसध्या अल निनो हा न्यूट्रल फेजमध्ये असून जुलैमध्ये तो सक्रिय होण्याची ५० टक्के शक्यता आहे. त्याचा प्रभाव जुलै-ऑगस्ट मध्ये ६० टक्के होईल, ३२३ मि.मी. असा अंदाज जागतिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेवटच्या महिन्यात कमी पाऊस होऊ शकतो.