डिसेंबरमध्ये सलग सहाव्या महिन्यात पृथ्वीने तापमान वाढीचा एक नवीन मासिक विक्रम प्रस्थापित केला आणि या वर्षी विक्रमी उष्णतेच्या लाटेत सर्वात उष्ण हिवाळाही ठरला आहे, अशी माहिती युरोप हवामान संस्थेने दिली आहे. फक्त एक महिना शिल्लक असताना, २०२३ मधील सर्वात उष्ण वर्षाचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे.
युरोप अवकाश संस्थेच्या कोपर्निकस हवामान बदल नोंद सेवेने बुधवारी पहाटे जाहीर केले की, नोव्हेंबर हा मागील सर्वात उष्ण नोव्हेंबरपेक्षा एक अंश सेल्सिअस अधिक उष्ण होता. नोव्हेंबरमधील तापमान पूर्व-औद्योगिक काळापेक्षा १.७५ अंश सेल्सिअस जास्त उष्ण होते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. गेले अर्धे वर्ष खरोखरच धक्कादायक होते, असे कोपर्निकसच्या उपसंचालक समंथा बर्गेस म्हणाल्या. नोव्हेंबरचे सरासरी १४.२२ अंश सेल्सिअस तापमान गेल्या ३० वर्षांच्या सरासरीपेक्षा ०.८५ अंश सेल्सिअस जास्त आहे. बर्गेसच्या म्हणण्यानुसार महिन्यातील २ दिवस २ अंश सेल्सिअस पूर्व-औद्योगिक काळापेक्षा जास्त उष्ण होते, जे यापूर्वी घडले नव्हते.
पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण
नुकतेच वेगवेगळ्या संस्थांच्या अहवालानुसार, पृथ्वीवरील मागील १२ महिने हे आतापर्यंतचे सर्वात अधिक उष्णतेचे नोंदवले गेले आहेत. क्लायमेट सेंट्रल climate central या स्वयंसेवी संस्थेच्या विज्ञान संशोधकांच्या अहवालानुसार गॅसोलिन, कोळसा, नैसर्गिक वायू आणि कार्बनडाय ऑक्साइडसारख्या वायूंमुळे तसेच इतर जीवाश्म इंधन आणि इतर मानवी क्रीयाकलापांमुळे नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनैसर्गिक तापमानवाढ झाली.
climate change: वाढत्या तापमानामुळे शेतजमिनींवरील पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये घट
२०१६ च्या तुलनेत ७ अंश जास्त तापमान
- आतापर्यंत हे वर्ष पूर्व-औद्योगिक काळापेक्षा १.४६ अंश सेल्सिअस उष्ण ठरले आहे, जे मागील सर्वात उष्ण वर्ष २०१६ च्या तुलनेत सुमारे सात अंशाने जास्त आहे.
- हे तापमान जगाने हवामान बदलासाठी ठरवलेल्या आंतरराष्ट्रीय कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे.
- २०१५ च्या पॅरिस हवामान कराराने दीर्घकालीन जागतिक तापमानवाढ पूर्व-औद्योगिक काळापेक्षा १.५ अंश पर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.