Lokmat Agro >हवामान > उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

Thousands of crores of black gold soil, sand hidden in the belly of Ujani Dam? | उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी जलाशयात गेली ४३ वर्षात १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ साचला आहे. यामध्ये मूल्य ५१ हजार कोटी रुपयांचे हे काळे सोने असूनही गेली दहा वर्षांत अनेकदा सर्वेक्षण झाले.

पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी जलाशयात गेली ४३ वर्षात १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ साचला आहे. यामध्ये मूल्य ५१ हजार कोटी रुपयांचे हे काळे सोने असूनही गेली दहा वर्षांत अनेकदा सर्वेक्षण झाले.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी जलाशयात गेली ४३ वर्षात १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ साचला आहे. यामध्ये मूल्य ५१ हजार कोटी रुपयांचे हे काळे सोने असूनही गेली दहा वर्षांत अनेकदा सर्वेक्षण झाले, राज्यकर्ते बदलले गेले.

मात्र उदासीन धोरणामुळे उजनीच्या पोटात दडलेल्या या लाखमोलाच्या सोन्यात कोणाचा पाय रुतला आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ३१५.५२ दलघमी मृत जलसाठ्यात साचलेला गाठ
४२३.९१ दलघमी एकूण एवढा गाळ साचला आहे.

२०११ मध्ये केंद्रीय जल आयोगाच्या आदेशानुसार दिल्लीतील तेजो विकास इंटरनॅशनल या खासगी संस्थेने 'डीजीपीएस' या तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानंतर त्याबाबतचा अहवाल केंद्रीय जल आयोगाकडे सादर झाला आहे.

त्यानुसार चर्चेतील माहिती अशी, उजनी धरणातील जिवंत जलसाठ्यामध्ये १०८.३९ दलघमी, तर मृत जलसाठ्चामध्ये ३१५.५२ दलघमी असा एकूण ४२३.९१ दलघमी एवढा गाळ साचला आहे. दरवर्षी त्यात भर पडत आहे.

शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रात १०.१३ हेक्टर मीटर गाळ उजनी धरणात येत असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणाअंती काढण्यात आल्याचे समजते. हा १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ काढल्यास तेवढ्याच क्षमतेने पाणी धरणात भरले जाऊ शकते.

धरणातील वाळूमिश्रित गाळ आणि वाळू यांचे प्रमाण ४०:६० एवढे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. धरणातील जिवंत व मृत पाणीसाठ्चात मिळून प्रत्येकी ६५ व १९० दलघमीप्रमाणे एकूण २५५ दलघमी वाळू आहे, तर ४३ व १२५ दलघमीप्रमाणे एकूण १६८ दलघमी माती आहे.

६० टक्के वाळू व ४० टक्के माती अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्याने धरणात पाणी असतानादेखील काढता येऊ शकते. त्यातून वाळू व मातीचे पृथ:करणदेखील करता येऊ शकते, उजनीत गाळमिश्रित वाळूचे प्रमाण २७.२४ टक्के होते. धरणात आलेला गाळ गृहीत धरल्यास धरणाची पाणी साठवण क्षमता ३२ टीएमसीने कमी झाल्याचे समोर आले होते.

धरणातील गाळ, माती व वाळू यांचा एकूण जलसाठा

 धरणातील जिवंत जलसाठ्यातधरणातील मृत जलसाठ्यात
गाळ१०८.३९ दलघमी३१५.५२ दलघमी 
वाळू६५ दलघमी १९० दलघमी 
माती४३ दलघमी १२५ दलघमी

उजनी जलाशयाबाबत कोणतीच हालचाल नाही
उजनी धरणाचे बांधकाम १९८० मध्ये पाणलोट क्षेत्र नाही. पूर्ण झाले. या धरणाचे स्वतःचे मात्र, जिल्ह्यातील जवळपास १८ धरणांतून सोडलेले पाणी पुढे उजनी धरणात जमा होते. या धरणाची प्रकल्पीय क्षमता ३ हजार ३३० दशलक्ष घनमीटर (२१७.२७ टीएमसी) आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ५३.५९ आणि मृत साठ्याचे प्रमाण ६३.६८ टीएमसी आहे.

यावर्षी राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची छाया आहे. दोनशेहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे नवीन धरण बांधण्यात अडचणी असल्याने गाळ काढणे हा पर्याय आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोयना धरण जलाशयातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र उजनी जलाशयाबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही.

साठवणूक क्षमता होतेय कमी
पावसाळ्यात नदी, नाले तसेच ओड्यांना येणाऱ्या पुरामुळे धरणक्षेत्रात माती, दगड, गोटे, रेती वाहून येते. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी होते. दर दहा वर्षांनी धरणातील गाळाचा आढावा घेऊन, अतिरिक्त गाळ काढणे अपेक्षित असते. तसे न झाल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी होऊन सिंचन क्षमता देखील कमी झाल्याचे वास्तव आहे.

Web Title: Thousands of crores of black gold soil, sand hidden in the belly of Ujani Dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.