Lokmat Agro >हवामान > विदर्भात आजपासून वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

विदर्भात आजपासून वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Thunderstorm rain forecast with hail from today in Vidarbha, Meteorological department alert for these districts | विदर्भात आजपासून वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

विदर्भात आजपासून वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

उत्तर ओडीशा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. जाणून घ्या सविस्तर..

उत्तर ओडीशा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. जाणून घ्या सविस्तर..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे सत्र सुरुच असून आजपासून विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

उत्तर ओडीशा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यावे ळी ३० ते ४० प्रतिकिमी वेगाने वारे वाहतील.

उद्या व परवा गारपीटीची शक्यता

उद्या दि १७ व १८ दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता संभावते, असे हवामान विभागाने सविस्तर हवामान अंदाजात नोंदवले आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे सांगण्यात आले.

तापमान सामान्य पेक्षा चढेच!

विदर्भात कमाल तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंशांनी चढे राहणार असून पुढील तीन ते चार दिवस तापमानात फारसा फरक जाणवणार नाही.

दरम्यान, आज दिनांक १६ मार्च रोजी विदर्भातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या व परवा (17,18 मार्च) रोजी पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.

यलो अलर्ट कुठे?

१६ मार्च- नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

१७ मार्च- अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

१८ मार्च- अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

१९ मार्च- वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया

Web Title: Thunderstorm rain forecast with hail from today in Vidarbha, Meteorological department alert for these districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.