Join us

Todays dam water: मराठवाड्यात १४.१७ टक्के पाणीसाठा, नाशिक, पुण्यात किती धरणसाठा शिल्लक?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 28, 2024 12:40 PM

बाष्पीभवनाचा वेग वाढला, धरणसाठा वेगाने घटतोय

राज्यात तापमानाचा पारा ४० पार जाताना दिसत असून धरणसाठ्यात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यात आता सरासरी ३०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात १४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून राज्यातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. नाशिक आणि पुण्यातील धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

मराठवाड्यातील लघू, मध्यम, मोठ्या धरणांमध्ये २७ एप्रिल रोजी १०२८ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ३६. २९ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. जो मागील वर्षी २७७० दलघमी म्हणजे ९७.८१ टीएमसी होता. जायकवाडी धरणात ९.९८ टक्के पाणीसाठा राहिला असून मराठवाड्यातील ९२० एकूण धरणांमध्ये १४.१७ टक्के जलसाठा उरला आहे.

नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तापमान ४० अंशांच्या वर गेले असून उष्णतेमुळे धरणात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी धरणसाठा वेगाने खालावत असून नाशिक विभागातील  ३२.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुण्यातील धरणांमध्ये आता २६.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईमराठवाडा