Todays Latest Rain Updates : राज्यभर सध्या चांगला पाऊस पडत असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाडा वगळता कोकण आणि विदर्भात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. हवामान विभागाने काल ८ जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला होता. त्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा सामावेश होता. आजही राज्यातील दोन जिल्ह्यांत पावासाच रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, आज कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा, मराठवाड्याचा एक जिल्हा आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासंह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सांगली, सोलापूर, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
येलो अलर्टकोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्हे, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्टकोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रेड अलर्टराज्यातील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.