Lokmat Agro >हवामान > Today's Rain Updates : राज्यात आज 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस?

Today's Rain Updates : राज्यात आज 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस?

Todays maharashtra monsoon Rain Updates Rain alert in 'these' districts in the state today Where will it rain? | Today's Rain Updates : राज्यात आज 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस?

Today's Rain Updates : राज्यात आज 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस?

Todays Latest Weather Updates : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल विदर्भातील केवळ चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज राज्यभर पावसाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसत आहे.

Todays Latest Weather Updates : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल विदर्भातील केवळ चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज राज्यभर पावसाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Latest Rain Updates : राज्यात बहुतांश ठिकाणी धो धो पाऊस पडत असून कालपासून राज्यातील पावसाची तीव्रता कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल विदर्भातील केवळ चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज राज्यभर पावसाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसत आहे.

दरम्यान, आज कोकण आणि घाटमाथ्यावरील रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये अति जोरदार ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

तर पूर्ण विदर्भामध्ये विजांच्या कडकटासह मुसळधार आणि अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले नाही.

कुठे आहे ऑरेंज अलर्ट?
कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात सातारा आणि विदर्भातील भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कुठे आहे येलो अलर्ट?
कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि विदर्भातील भंडारा वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 

दरम्यान आज मराठवाड्यातील कुठल्याच जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आलेला नाही. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पूर्ण मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे.

Web Title: Todays maharashtra monsoon Rain Updates Rain alert in 'these' districts in the state today Where will it rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.