Lokmat Agro >हवामान > जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग?

जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग?

Two days for water to arrive in Jayakwadi; How much was discharged from the dams of Nagar, Nashik today? | जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग?

जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग?

नांदूर मधमेश्वर मधून आज सकाळी १६ हजार ७८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

नांदूर मधमेश्वर मधून आज सकाळी १६ हजार ७८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जायकवाडीवरील नाशिक व अहमदनगर पाणलोट क्षेत्रातील धरणांतून रविवारी पाण्याचा विसर्ग दुप्पट करण्यात आला असला तरी जायकवाडीत पाणी येण्यासाठी एक ते दोन दिवसाचा कालावाधी लागणार आहे. आज (दि.२७) अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांमधून नदीत विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्चर धरणातून आज सकाळी १६ हजार ७८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. भंडारदरा धरणातून ९ हजार ५३६ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. काल दुपारी २ च्या सुमारास ८ हजार ८४० पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

निळवंडे धरणातून काल १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आज निळवंडेतून पुन्हा एकदा १० हजार ०१ क्यूसेक विसर्गाची वाढ झाली आहे. ओझर बंधाऱ्यातून ९ हजार ८३ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. मुळा धरणातून ४००० क्यूसेक पाणी नदीत सोडण्यात आले असून जायकवाडीच्या दिशेने पाणी पोचण्यास एक ते दोन दिवस लागतील असा अंदाज आहे.

नाशिक जिल्ह्यातील  गंगापूर धरणातून २ हजार ६१६ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. दारणा धरणातून ७५५६ क्सूसेक तर कडवा ३ हजार २४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुकणे धरणातून ११०० क्यूसेक तर नांदूर मधमेश्वर मधून तब्बल १६ हजार ७८५ पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे.

दारणातून एकूण ७ हजार ७४ क्यूसेक, भाम धरणातून १५० क्यूसेक, मुळा धरणातून ४ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणे आणि अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची वेळ एकच झाली. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने वेगाने पाणी येईल. सर्व धरणांतून सुमारे २४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग रविवारी सुरू होता. पाटबंधारे विकास मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस लागतील, असे सांगितले.

Web Title: Two days for water to arrive in Jayakwadi; How much was discharged from the dams of Nagar, Nashik today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.