लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या शहरांसाठी कायम वरदायिनी असलेल्या उजनी धरणातीलपाणीसाठा सध्या मायनस ५२ टक्क्यांच्या वर गेला असून, सोलापूर शहरासाठी आता १० मेपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले गेले आहे.
यातून साधारणतः पाच ते साडेपाच टीएमसी पाणी आणखी धरणातून कमी होणार आहे. हे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर धरण उणे ५५ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे धरणावरील ४१ पाणीपुरवठा योजनांपैकी ९९ टक्के योजना बंद पडणार आहेत.
गतवर्षी सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने उजनी केवळ ६६ टक्क्यांपर्यंतच भरले. मागील सहा महिन्यांत तेही रिकामे झाले आहे. सध्या जिल्ह्यात दाहकता वाढत असून आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र टँकर सुरू झाले आहेत.
त्यातच धरणावर अवलंबून श्री सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक, कर्जत, धनस्मृती टेक्स्टाईल प्रा.लि. झरे, नेचर डिलाईट प्रा. लि. कळस, भैरवनाथ शुगर प्रा. लि. आलेगाव, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, रे नगर फेडरेशन कुंभारी, हरनेश्वर अॅग्रो लि. कळस (ता. इंदापूर), बारामती अॅग्रो लि. पिंपळी, अंबालिका शुगर वर्क्स प्रा. लि. अंबालिका नगर, कर्जत, भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ युनिट-दोन, श्री मकाई साखर कारखाना, भिलारवाडी, युटोपीयन शुगर लि. यांचाही पाणीपुरवठा उजनीची पातळी खालावल्याने बंद झाला असून, काहींचा पाणीपुरवठा लवकरच बंद पडेल, अशी सद्यःस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या उजनीची पाणीपातळी
एकूण पाणीसाठा : ४८६.००० मी.
एकूण पाणीपातळी : १०१४ (३५.८१ टीमसी दलघमी)
उपयुक्त पाणीपातळी: वजा ७८८.७१ दलघमी (टीमसी- २७.८५)
टक्केवारी : वजा ५१.९९ टक्के
बाष्पीभवन : ७.३२ एमएम
भीमा नदी : ६००० क्युसेक
अधिक वाचा: Water Scarcity पाणी टंचाई मधून आपण बोध कधी घेणार?