सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची वाढ थांबली असून, दौंड येथून येणारा विसर्गही अत्यल्प झाला आहे. मागील तीन दिवसांपासून उजनीची टक्केवारी ६० वरच स्थिरावली आहे. परतीचा पाऊस झाला नाही तर उजनी शंभर टक्के भरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
चालू वर्षी शेतीसाठी किती आवर्तने मिळणार, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून उजनीच्या पणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस थांबला आहे. दौंड येथून येणारा विसर्ग कमी किमी होत गेला असून, तो सध्या ५९४ क्युसेक झाला आहे. हा विसर्ग नगण्य असल्याने उजनीची संथगतीने सुरू असलेली वाढ आता पूर्णपणे थांबली आहे. उजनी धरण ६.६६ टक्क्यांवरच स्थिरावले आहे.
मागील पावसाळ्यात उजनी धरण १७ जानेवारीपर्यंत शंभर टक्के भरलेले होते. त्यावेळी धरणात एकूण जलसाठा ११७ टीएमसी होता, तर उपयुक्त साठा ५३.५७ एवढा होता. केवळ साडेतीन महिन्यांत धरणातील ५३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा संपूर्ण ७ मे २०२३ पासून धरण मायनसमध्ये जाण्यास सुरुवात झाली होती. ९ जुलैपर्यंत धरण मायनस ३६ टक्के झाले होते. यावेळी मृतसाठ्यातील १२ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला होता. यानंतर १ ऑगस्टपासून धरण प्लसमध्ये येण्यास प्रारंभ झाला होता. मात्र, चालू वर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने अडीच महिने झाले तरी उजनी धरण ६० टक्क्यांवरच रेंगाळत आहे. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत धरणात असलेला जलसाठा अंतिम समजून धरणातील पाण्याचे नियोजन शासन व प्रशासन कालवा पाणीवाटप समितीच्या माध्यमातून करीत असते. पिण्याच्या पाण्यासह प्रथम प्राधान्य देऊन १५ जूनपर्यंतचे नियोजन केले जाते. मागील वर्षी सलग चार महिने शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने नियोजन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मे-जून महिन्यात शेतीला पाण्याची गरज असताना पाणी सोडता न आल्याने शेतकऱ्यांना उभी पिके जळताना पाहावी लागली होती.
मागील अनुभव जमेस धरून चालू वर्षी उजनीच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. उपलब्ध पाण्यातून शेतीसाठी किती आवर्तने सोडली जाणार याचे नियोजन १५ ऑक्टोबरनंतर होणाऱ्या कालवा पाणीवाटप समितीच्या बैठकीमध्ये करण्यात येईल. त्यावरच उजनीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक नियोजन करावे लागणार आहे.
धरणाची सद्यस्थितीएकूण पाणी पातळी ४९४.९०० मीटरएकूण जलसाठा ९६. १५ टीएमसीउपयुक्त साठा ३२.५० टीएमसीटक्केवारी ६०.६६इन्फ्लोदौंड ५९४ क्युसेकउपसासीनामाढा उपसा ३३३ क्युसेकदहिगाव उपसा १२० क्युसेक