टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी स्थीर असून हळूहळू पाणी पातळी वाढ होत आहे. यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या आडसाली ऊस लागवडी खोळंबल्या आहेत.
दौंड येथील विसर्ग कमी-अधिक प्रमाणात सातत्याने चालू असून यामुळे उजनी पाणी पातळी गेल्या २५ दिवसात २० टक्के वाढली आहे. तर जून महिन्यात एकूण १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली.
गतवर्षी केवळ २१ मि. मी. पाऊस झाला होता. उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्ग ९ जूनपासून सातत्याने सुरू असून यामुळे हळूहळू उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. सध्या दौंड येथून सायंकाळी सहा वाजता १ हजार ३०० क्यूसेक सुरू आहे.
सोमवारी सकाळी १ हजार ९०० क्यूसेक होता. त्यात सायंकाळी घट झाली होती. तर उजनी धरणात एकूण ४१.५० टीएमसी पाणीसाठा झाला असून गतवर्षीचा तुलनेत ३ टीएमसीने कमी आहे.
गतवर्षी २ जून २३ रोजी ४४.६८ टीएमसी पाणीसाठा होता. तर टक्केवारी ३५.४२ टक्के होती. यावर्षी पाऊस लवकर पडला असला तरी उजनी पाणी पातळी ५९.९९ टक्केपर्यंत खाली गेली होती. उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यासाठी भीमा खोऱ्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तरच उजनी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.
ऊस लागवडी खालील क्षेत्र उजनीचा पाण्यावर अवलंबून असल्याने आडसाली ऊस लागवडीसाठी आणखी वेग आलेला दिसत नाही. उजनी वजा पातळीत असल्याने शेतकरी खरीप हंगामातील मका, सोयाबीन, उडीद ही पिके घेण्याकडे कल दिसून येत आहे.
गेल्या चार वर्षातील २ जून रोजीची स्थिती■ २ जुलै २०२१ वजा ९.१२■ २ जुलै २०२२ वजा १०.८७■ २ जुलै २०२३ वजा ३५.४२