Lokmat Agro >हवामान > Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी

Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी

Ujani Dam stop rain.. Reduction in discharge from Daund, how much water came in Ujani Dam | Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी

Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी

उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती.

उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

टेंभुर्णी : उजनी धरणातदौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. सध्या भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने दौंड विसर्गात घट होत आहे.

शुक्रवार, २८ रोजी सायंकाळी ६ वाजता १ हजार १५४ क्युसेक इतका सुरू होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे दौंड विसर्ग ३ हजार क्युसेकपर्यंत वाढला होता. गुरुवारी सकाळी ३ हजार १०० क्युसेक तर शुक्रवारी सकाळी घट होऊन १ हजार ४०० क्युसेक इतका झाला होता.

सायंकाळी पुन्हा घट होत गेली. दोन दिवसांपूर्वी उजनी पाणीपातळीत वाढ होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात घट झाली आहे.

सध्या उजनी पाणीपातळी वजा ४२.५२ टक्के झाली असून ४०.८२ टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात आहे. उजनी पाणीपातळी वाढण्यासाठी भीमा खोऱ्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

Web Title: Ujani Dam stop rain.. Reduction in discharge from Daund, how much water came in Ujani Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.