उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात पुन्हा घट झाली असून, दौंड येथून दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता ४ हजार ७७९ क्यूसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. गुरुवारी सकाळी ६ हजार ६७८ क्यूसेक होता. सायंकाळी दौंड विसर्गात घट होत गेली.
गेल्या सहा दिवसांत उजनी धरणाचीपाणीपातळी आठ टक्क्यांनी वाढली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात ५ जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे उजनी पाणी वजा ५९.९९ टक्क्यांवरती ७ जूनपर्यंत स्थिर राहिली होती.
७ जूननंतर उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली. ९ जूनपासून दौंड विसर्ग उजनी धरणात मिसळण्यास सुरुवात झाली होती.
यावर्षी प्रथमच जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांत आठ ते दहा टक्क्यांनी पाणीपातळी वाढली आहे. गेल्या सहा दिवसांत उजनी धरणात साडेचार टीएमसी पाणीपातळी वाढली आहे. उजनीवरील भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.
तर दोन दिवसांत उजनी धरण परिसरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १ जूनपासून उजनी परिसरात १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या उजनी धरणात ३५.८१ टीएमसी पाणीसाठा असून, पाणीपातळी वजा ५१.९९ टक्के आहे.
शनिवारी वजा ५० टक्क्यांपर्यंत येण्याचा अंदाज असून, उजनी मायनसच्या विळख्यातून कधी बाहेर येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गतवर्षी १४ जून रोजी वजा २७.७५ टक्के पाणीपातळी होती.
अधिक वाचा: Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा