Join us

Ujani Dam उजनी ५ टक्क्याने वाढली.. लवकरच प्लसमध्ये येण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 9:42 AM

उजनी Uajni Dam Water Level पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मान्सून पावसाने उजनी धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीने वाढला आहे.

टेंभुर्णी: उजनी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मान्सून पावसाने उजनी धरणाचापाणीसाठा ३ टीएमसीने वाढला आहे. उजनी लाभ क्षेत्रात संततधार पावसामुळे उजनी धरणाचीपाणी पातळी वाढण्यास मदत होत असून वजा ५५.२७ टक्के झाली आहे.

गेल्या चार दिवसात पाच टक्के पाणी पातळी वाढली आहे. तर दौंड येथून सायंकाळी ६ वाजता ३ हजार ७०२ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. उजनी धरण परिसरात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने प्रथमच उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. साधारणपणे जूनच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात होऊन उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात होते.

यावेळी मान्सून पूर्व मान्सूनचा दमदार पावसाने चार दिवसात उजनी पाणी पातळी ५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी ७ जूनपर्यंत वजा ५९.९९ टक्केपर्यंत पाणीपातळी खाली गेली 2होती. तर ३१.५२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होत.

गतवर्षी १२ जून रोजी वजा २७.१२ टक्के पाणीसाठा होता. उजनी धरण मायनस साठ्यातून कधी बाहेर येते, याकडे सर्वांचा नजरा लागलेल्या आहेत. सध्या उजनी धरणात ३४.५ टीएमसी साठा वाढला आहे. यामुळे आनंदाचे वातावरण आहे.

सोलापूरला यलो अलर्टजिल्ह्यातील पंढरपूर, माढा, बार्शी या भागात मंगळवारी रात्री अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. या अंदाजामुळे आपत्कालीन व्यवस्था सतर्क झाली आहे.

अधिक वाचा: Weather Forecast आज विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांसाठी 'यलो अलर्ट'

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरपाऊसमोसमी पाऊसदौंड