Lokmat Agro >हवामान > Ujani Dam Water आनंदाची बातमी.. उजनीची पाणी पातळी २ टक्क्यांनी वाढली

Ujani Dam Water आनंदाची बातमी.. उजनीची पाणी पातळी २ टक्क्यांनी वाढली

Ujani Dam Water; Good news.. Water level of Ujani increased by 2 percent | Ujani Dam Water आनंदाची बातमी.. उजनीची पाणी पातळी २ टक्क्यांनी वाढली

Ujani Dam Water आनंदाची बातमी.. उजनीची पाणी पातळी २ टक्क्यांनी वाढली

भीमा व नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील १८ धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भीमा व नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील १८ धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

टेंभुर्णी: भीमा व नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील १८ धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली.

तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे उजनी धरणाचीपाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली आहे. १.०१२ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

रविवार दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता धरणात वजा ५७.९१ टक्के पातळी झाली आहे. तर एकूण ३१.०२ टीएमसी पाणीसाठा आहे. उजनीकडे येणाऱ्या दौंड येथील विसर्गास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजता ६ हजार २८६ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत होता.

दौंड येथील विसर्गाने उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.

एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग
गतवर्षी २६ जून रोजी उजनी पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी. पाऊस झाला होता. एकूण ४६१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर दौंड येथून उजनी धरणात ११ जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग सुरू झाल्याने सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

भीमा खोऱ्यातील घोड, खडकवासला, पानशेत, चासकमान, मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला असून भीमा खोऱ्यातील १८ धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. नीरा खोयातील गुंजवणी, नीरा देवधर, नीरा, भाटघर या धरण क्षेत्रात दमदार पावसाचे आगमन झाले आहे.

अधिक वाचा: Almatti Dam अलमट्टीमधील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या निकषांनुसार ठेवावा लागेल

Web Title: Ujani Dam Water; Good news.. Water level of Ujani increased by 2 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.