जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी गेल्या दहा दिवसांत दहा टक्के पाणी पातळी वाढली आहे. गतवर्षी पेक्षाही यंदा दहा टक्के अधिक पाणीसाठा उजनी धरणात झाला आहे. दि. १८ रोजी सायंकाळी सहा वाजता वजा २५.५२ टक्के पाणीपातळी झाली होती.
उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी १३. ६६ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या दौंड येथील विसर्गात घट होत असून, ४ हजार ४३४ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे. १२३ टीएमसी क्षमता असलेले उजनी धरणाचा मृत साठा ६३.६६ टीएमसी आहे.
गतवर्षी उजनी ६०.६६ टक्के भरले होते. लोकसभा निवडणुकीचा तोंडावर उजनी धरणातून पाणी सोडल्याने यावर्षी उजनी वजा ५९.९९ टक्के एवढे खाली गेले होते. यावर्षी जून महिन्याचा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने यावर्षी उजनी धरणाची पाणी पातळी चांगल्या प्रकारे वाढली आहे.
दौंड येथून सातत्याने विसर्ग सुरू असल्याने उजनी धरण कधी मृत साठ्यातून बाहेर येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या ४ जूनपासून उजनी धरणाचा पाणीसाठा १८.४८ टीएमसी जमा झाला आहे.
४ जूनला ३१.५२ टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात शिल्लक होता. सध्या ५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी सोमवारी सकाळी २२ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता.
सध्याची आकडेवारी
टक्केवारी वजा : - २५.५२
टीएमसी : ४९.९८
दौंड विसर्ग : ४ हजार ४३४
गतवर्षी १८ जुलै २३ रोजीची स्थिती
टक्केवारी वजा : - ३४.५०
टीएमसी : ४५.१८
दौंड विसर्ग : १ हजार ४०७
असे आहे उजनीचे गणित
उजनी धरणात १०० टक्के भरल्यानंतर ११७ टीएमसी पाणीसाठा जमा होतो, तर १११ टक्के भरल्यानंतर १२३ टीएमसी पाणीसाठा जमा होतो. ६३.६६ टीएमसी मृत साठ्यात धरले जाते, तर ५३.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला जातो.