उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने उजनी धरणातून सायंकाळी ५ वाजता १६ दरवाजातून ४१ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. तसेच वीर धरणातून नीरा नदीत ५३ हजार ८४७ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे भीमा पात्रात जवळपास १४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चंद्रभागेला पाण्याला वेढा घातला आहे. उजनी धरणात दौंड येथून ९८ हजार क्युसेक मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीकाठचा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे पाणी उद्या, पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
वीर व उजनी धरणाचा विसर्ग नृसिंहपूर येथे एकत्र येऊन पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाणी पातळी सोमवारी सायंकाळपर्यंत १ लाख क्युसेकपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची जलपातळी ९२ टक्के झाली होती.
दहा दिवसात उजनी भरले शंभर टक्केशुक्रवार, २६ जुलै रोजी उजनी मृत साठ्यातून बाहेर आले होते. केवळ दहा दिवसात उजनी शंभर टक्के भरले आहे. गेल्या २४ वर्षात उजनी धरण सात वेळा शंभर टक्के भरले नव्हते.