Lokmat Agro >हवामान > Ujani Dam Water Level: आठ दिवसांत उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता वाचा सविस्तर

Ujani Dam Water Level: आठ दिवसांत उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता वाचा सविस्तर

Ujani Dam Water Level: Ujani likely to come out of dead reservoir in eight days Read more | Ujani Dam Water Level: आठ दिवसांत उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता वाचा सविस्तर

Ujani Dam Water Level: आठ दिवसांत उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता वाचा सविस्तर

बंडगार्डन येथील विसर्ग वाढल्याने दौंड विसर्गात मोठी वाढ होण्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहायक अभियंता प्रशांत माने यांनी व्यक्त केला.

बंडगार्डन येथील विसर्ग वाढल्याने दौंड विसर्गात मोठी वाढ होण्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहायक अभियंता प्रशांत माने यांनी व्यक्त केला.

शेअर :

Join us
Join usNext

टेंभुर्णी : पुणे शहरासह भीमा खोऱ्यात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या बंडगार्डनसह दौंड विसर्गात वाढ झाली आहे. बंडगार्डन येथून १६ हजार ७२३ तर दौंड येथून १२ हजार २५३ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.

बंडगार्डन येथील विसर्ग वाढल्याने दौंड विसर्गात मोठी वाढ होण्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहायक अभियंता प्रशांत माने यांनी व्यक्त केला. १ ऑगस्टपर्यंत उजनी धरणाची पाणी पातळी मृत साठ्यातून बाहेर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या उजनी पाणी पातळी वजा १९.८८ टक्के झाली आहे. भीमा खोऱ्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ३ धरणे शंभर टक्के भरत आली असून वडीवळे धरणातून सकाळी ५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता.

त्यात सायंकाळी घट होऊन १ हजार १२४ क्युसेक करण्यात आला आहे. तर कळमोडी धरणातून १ हजार २७१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. हा सोडण्यात आलेला विसर्ग थेट इंद्रायणी नदीद्वारे दौंड विसर्गात मिसळणार आहे.

खडकवासला धरण ८८.५२ टक्क्यांपर्यंत भरले असून खडकवासला धरणातून कधीही पाणी सोडले जाऊ शकते. यामुळे मुळा-मुठा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कळमोडी १०० टक्के, वडीवले ८८ टक्के, खडकवासला ८८ टक्के भरले आहे. तर पानशेत ६४.६४, वरसगाव ५०.५०, मुळशी ५१, कासारसाई ६५.३२, पवना ५०.९८, चिलईवाडी ६८ टक्के भरत आल्याने ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यास उजनी पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे

मुसळधार पाऊस दोन महिन्यात भीमा खोऱ्यातील धरण
परिसरात मुसळधार पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक टेमघर येथे १ हजार ५९४ मिमी. मुळशी १४४८, वडीवळे १३११, पवना १०७७ मिमी. वरसगाव व पानशेत ९०६ मिमी. १ जूनपासून पाऊस झाला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात २५३ मिमी. पाऊस झाला आहे.

उजनी सध्याची स्थिती
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा १९.८८ टक्के झाली असून ५३.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी उपयुक्त पाणी पातळीत येण्यासाठी आणखी दहा टीएमसी पाण्याची गरज आहे. गतवर्षी २४ जुलै २०२३ रोजी वजा २४.५८ टक्के पाणी पातळी होती.

अधिक वाचा: राज्यात सर्वाधिक पाऊस व सर्वाधिक पेरणी झाली या जिल्ह्यात

Web Title: Ujani Dam Water Level: Ujani likely to come out of dead reservoir in eight days Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.