Join us

उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 2:32 PM

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते.

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. सर्वात जास्त मृतसाठा ६३.६६ टिएमसी असलेले उजनी धरण आहे.

यंदा भीमा खोऱ्यात अत्यल्प पावसामुळे उजनी शंभर टक्के भरू शकले नाही. यंदा केवळ उजनी धरणात ६०.६६ टक्के पाणी पातळी झाली होती. सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी रब्बी पिकांसाठी उजनीतून मुख्य कालवा, सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून तर सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. १२ ऑक्टोबर रोजी धरणात एकूण ९६. १५ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

अधिक वाचा: ड्रीप करताय? किती मिळेल अनुदान आणि कुठे कराल अर्ज

या विविध योजनांसाठी ३१.५८ टीएमसी पाणी आतापर्यंत वापर झालेला आहे. त्यात विविध योजनांसाठी एकूण २८ टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडण्यात आले आहे. अद्यापही उजनी धरणातून मुख्य कालव्यातून २ हजार ४०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून सीना-माढा, दहिगाव व भीमा-सीना जोड कालवा येत्या दोन दिवसात बंद होणार आहेत. उजनी धरणात शुक्रवार १९ रोजी एकूण ६४.५७ टीएमसी ०.९१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

१० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी२०१२/१३ मध्ये उजनी १६.२६ %२०१५/१६ मध्ये १४.६७ टक्के भरले होते.२०२३/२४ मध्ये ६०.६६ टक्के भरले होते.

टॅग्स :उजनी धरणधरणसोलापूरपाणीनदी