Lokmat Agro >हवामान > उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

Ujni's water level alarming; Only 17 percent water storage | उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातीलपाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. यंदा सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईची झळ सोसावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यंदा उजनी धरण क्षेत्रात व सोलापूर जिल्ह्यात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय आषाढी, कार्तिक यात्रेसाठी पाणी सोडण्यात आले. शिवाय बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या उजनी धरणात आजचा पाणीसाठा ७३.१४ टीएमसी एवढा आहे. धरणातील बोगदा विसर्ग ३०० क्युसेक तर मुख्य कालवा विसर्ग १००० क्युसेक आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन घट ०.७० द.ल.घ.मी. एवढा असून धरणातील घट व वाढ -६.६८ द.ल.घ.मी एवढा आहे.

औज बंधाऱ्यात मुबलक पाणी
सध्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी कमी होत आहे. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिप्परगा, औज बंधाऱ्यातील पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले; मात्र भविष्यात पाणीटंचाईचा सामना सोलापूरकरांना करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टंचाई आराखडा तयार करण्यासाठी धडपड
१ जूनपासून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात फक्त्त ४६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. आगामी काळातील पाणीटंचाई पाहता जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येत आहे. याशिवाय अन्य मागनि टंचाईवर मात कशी करता येईल याबाबतचाही विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विंधन विहिरी, जलस्रोत, बोअर अधिग्रहण करण्यासोबतच अन्य उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Ujni's water level alarming; Only 17 percent water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.