छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात शुक्रवारी हवामानात बदल झाला. सकाळी धुके, दिवसभर गारवा आणि सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि ५) जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.
शुक्रवारी दिवसभर हवेत गारवा होता. कमाल तापमान २७.२, तर किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस होते. किमान तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात गारवा होता. हा गारपीट होण्याचा काळ असतो. बाष्प तयार होऊन हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यांतील वातावरण बदलले आहे. तो पट्टा पुढे सरकला असून मध्य प्रदेशापर्यंत आला आहे. परिणामी राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरण बदलले आहे.
कधीपर्यंत राहणार पावसाचा प्रभाव?
सोलापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळे, बुलढाणा व मराठवाड्यातील काही भाग या वातावरणाच्या प्रभावाखाली आहे. पुढील ४८ तास हा प्रभाव राहील. दिवसभर ढगाळ वातावरण आणि त्यात धुके असल्यामुळे शहर व परिसरात दृष्यमानता कमी झाली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारासच दिवस मावळल्यासारखे चित्र दिसत होते.
राज्यात आजपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता- हवामान विभागगारपीटीची शक्यता नाही
या वातावरणामुळे हलक्या पावसाच्या सरी पडतील. परंतु, गारपीट होणार नाही. हा अल निनोचा थोडा राहिलेला प्रभाव आहे. त्यामुळे अशी परिस्थिती असल्याचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
पुढील तीन दिवस तापमान कसं राहील? वाचा हवामान अंदाज विजेचा लपंडाव...
शहरात सहा वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला, वीजपुरवठा सुरळीत होण्यास अर्धा ते एक तासापर्यंतचा काळ गेला.