Lokmat Agro >हवामान > Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा

Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा

Vidarbha Dam Water Storage: 100 percent water storage in 14 irrigation projects in West Vidarbha | Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा

Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा

Dam Water Storage in Western Vidarbha : पश्चिम विदर्भातील अनेक धरणे आता १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

Dam Water Storage in Western Vidarbha : पश्चिम विदर्भातील अनेक धरणे आता १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अमरावती : जुलै ते ऑगस्ट महिन्यात सलग पाऊसाने हजेरी लावली होती, तर सप्टेंबरमधील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने पश्चिम विदर्भातील (West Vidarbha Dam Water Storage) एका, तर १३ मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा झाला आहे, तर नऊपैकी सहा मोठ्या प्रकल्पांसह आठ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.

अपर वर्धा धरणातील साठा संभाव्य पावसाची स्थिती लक्षात घेता विसर्ग करून नियंत्रित ठेवण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २७ मध्यम व २५३ लघु प्रकल्प आहेत. विभागात एकूण ३१०२ दलघमी पाणीसाठ्याची क्षमता असून, सद्य:स्थितीत २७६२ दलघमी (८९ टक्के) साठा झाला आहे.

बहुतांश प्रकल्पातील जलपातळी वाढलेली असून, यवतमाळमधील पूस प्रकल्प १०० टक्के भरला आहे, तर अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरण १०० टक्के भरले असताना पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे विसर्ग करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या धरणाचे तीन गेट उघडण्यात आले असून, ९८ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या धरणांच्या श्रेणीतील अरुणावती प्रकल्पात ९६ टक्के, काटेपूर्णा ९८ टक्के, वाण ९५ टक्के, पेनटाकळी ९६ टक्के व खडकपूर्णामध्ये ९६ टक्के जलसाठा झालेला आहे. पश्चिम विदर्भातील १३ प्रकल्पांतील जलसाठा शंभर टक्के झालेला आहे.

सहा प्रकल्पांची वाटचाल शंभरी गाठण्याकडे सुरू आहे. मध्यम प्रकल्पात सद्य:स्थितीत ६५६ दलघमी साठा झाला असून, प्रकल्पीय संचय क्षमतेच्या तो ८५ टक्के आहे, तर २५३ लघु प्रकल्पांतील ७८० दलघमी (८३ टक्के) जलसाठा झाला आहे. जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली असून, आता परतीच्या पावसाची त्यात भर पडणात आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान यंदा प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती उत्तम असल्याने आगामी रब्बी ताण यामुळे हलका होणार आहे.

 

हे प्रकल्प भरलेत १०० टक्के 
यवतमाळ पूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, अकोला : निर्गुणा, मोर्णा, उमा, वाशिम जिल्ह्यांतील सोनाला, एकबुर्जी आणि बुलढाणा जिल्ह्यातील पलढग, मस आदी प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत.

Web Title: Vidarbha Dam Water Storage: 100 percent water storage in 14 irrigation projects in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.