पावसाचा अनियमितपणा असला तरी काही प्रकल्पांमध्ये पाण्याचा समाधानकारक साठा झाला आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा झाल्याने नांदेडकरांची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. अर्धा पावसाळा सरला तरीही सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने चिंता निर्माण झाली होती. नांदेड शहराजवळील विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पाणीसाठा नसल्याने शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
पाणीसाठा झाला आहे. ८४.६१ टक्के पाणी जमा झाल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईतून मुक्तता झाली आहे. उशिरा का होईना प्रकल्पांत पाणीसाठा झाल्यान नागरिकांची चिंता मिटली आहे. येत्या काही दिवसांत साठा १०० टक्के होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अप्पर मानार प्रकल्पात १८ टक्के, लोअर मानार प्रकल्पात ५५ टक्के आणि अप्पर इसापूर प्रकल्पात ६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील सिंचनाचा आणि काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
इतर प्रकल्पांतही पाणी
■ जिल्ह्यातील अप्पर मानार प्रकल्पात १८ टक्के, लोअर मानार प्रकल्पात ५५ टक्के आणि अप्पर इसापूर प्रकल्पात ६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील सिंचनाचा आणि काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.