Water Dam Storage :
अनिस शेख :
महान येथील जलसाठ्यात हळूहळू पाणी वाढ होत असल्यामुळे काटेपूर्णा धरणाची पाणीपातळी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. धरणाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान धरणात ८५ टक्के जलसाठा आरक्षित ठेवून त्यावरील अतिरिक्त पाणी नदी पात्रात विसर्ग करावे लागते. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी दहाही दरवाजे ५ सेंटिमीटरने उघडून विसर्ग करण्यात आला. आता १६ ऑगस्टपासून ९५ टक्के जलसाठा आरक्षित ठेवावा लागणार आहे.१ ऑगस्टपासून धरणाचा पाणीसाठा वाढत असल्याने वेळोवेळी अतिरिक्त पाण्याचा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त महान धरणावर १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवसांसाठी मुख्य दहाही दरवाज्यावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती. १३ ऑगस्ट रोजी रात्री धरणाची पाणी पातळी ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे रात्री ८ वाजता धरणाचे दहाही दरवाजे ५ सेंटिमीटरने उघडून अतिरिक्त पाण्याचा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी जलसाठ्यात पुन्हा वाढ झाल्याने दहाही दरवाजे उघडून नदी पात्रात विसर्ग केला. रात्री १० वाजता पाणीपातळी बघता धरणातून सुरू होत आहे. असलेला विसर्ग बंद करण्यात आला.
...तर पाण्याचा करावा लागेल विसर्ग• धरणाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणात १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान ९५ टक्के जलसाठा आरक्षित ठेवावा लागणार आहे.• या पंधरवड्यात पाणीपातळी ९५ टक्क्यांच्यावर पोहोचल्यास त्यावरील अतिरिक्त पाण्याचा नदी पात्रात विसर्ग करावा लागेल. विसर्ग करण्याकरिता आणखी ५ टक्के पाण्याची आवश्यकता आहे.महान धरणाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणात १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ९५ टक्क्यांपर्यंत पाणी आरक्षित ठेवावे लागते. पाणीपातळी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास त्यावरील अतिरिक्त पाणी नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवितधरणामध्ये पाणी साठा वाढल्याने वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता तर मिटलीच, त्यासोबत नदी काठावरील परवानाधारक शेतकऱ्यांची रब्बी हंगामाचीसुद्धा चिंता मिटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. - ऋषिकेश इंगोले, शाखा अभियंता, महान धरण