गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आज सकाळी नांदूर माध्यमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. नाशिक मधून निघणारे हे पाणी मराठवाड्याच्या फायद्याचे समजले जाते.
याचअनुषंगाने जाणून घेऊया सेवानिवृत जलसंपदा इंजि. हरिश्चंद्र चकोर संगमनेर यांनी लोकमत अॅग्रोला दिलेल्या माहितीनुसार राज्यात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग.
राज्यात दिनाक २५ जुलै सकाळी ८ पर्यंत भंडारदरा धरण (प्रवरा नदी) शून्य, निळवंडे धरण (प्रवरा नदी)) शून्य, देवठाण (आढळा नदी) शून्य, भोजापूर (म्हाळुंगी) शून्य, ओझर (प्रवरा नदी) शून्य, कोतूळ (मुळा नदी) २९५३३ क्युसेक, मुळाडॅम (मुळा) शून्य, गंगापूर (डॅम) शून्य, दारणा शून्य, नां. मध्यमेश्वर सकाळी ८ पर्यंत ५५७६ क्युसेक तर सकाळी ९ वाजता ८८०४ क्युसेक, जायकवाडी शून्य, विसर्ग सुरू आहे.
यासोबतच हतनूर (धरण) ३०३०० क्युसेक, सिना (धरण) शून्य, घोड (धरण) शून्य, उजणी (धरण) शून्य, राधानगरी १५०० क्युसेक, राजापूर बंधारा (कृष्णा) १,५३,५४२ क्युसेक, कोयना (धरण) १०५०, गोसी खुर्द (धरण) ३,१४,३९७ क्युसेक, खडकवासला शून्य, पानशेत शून्य, जगबुडी नदी (कोकण) ३९५९५ क्युसेक, गडनदी (कोकण) १,०४,९६१ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
हेही वाचा - Maharashtra Dam Storage राज्यातील पाणीसाठा वाढला; 'या' धरणातून होतोय सर्वाधिक विसर्ग