नांदुर मधमेश्वर येथील धरणातून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ११ हजार ७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी आज शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. रात्रीतून पावसाचा वेग वाढल्याने पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याचे देखील शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
मागील दीड महिन्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक नव्हती; मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे विविध धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. याच अनुषंगाने नांदूर मधमेश्वर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.
त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ११ हजार ७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे.
हेही वाचा - Free Electricity जीआर निघाला; राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज