Lokmat Agro >हवामान > Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग

Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग

Water Release: 1,700 cusecs of water released from Nilwande through Pravara River | Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग

Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग

Water Release : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात ८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, निळवंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे.

Water Release : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात ८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, निळवंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात ८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, निळवंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे.

सध्या १ हजार ७०० क्युसेकने निळवंडेत धरणातून प्रवरा नदीतूनपाणी लाभक्षेत्राकडे झेपावत आहे. त्यातून प्रवरा नदीतील शेवटच्या टोकापर्यंत १४ बंधारे भरणे सुरू आहे.

पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, भंडारदरा, निळवंडे, आढळा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला.

मात्र, मार्चच्या प्रारंभीच तालुका तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापासूनच आदिवासी परिसरासह शहरात उन्हाचा कडाका जाणवत असतानाच धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट होत आहे.

निळवंडे धरणातून सुरू असलेले आवर्तन सात दिवस चालणार आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच टंचाई परिस्थिती जाणवू लागली आहे. माळरान ओसाड झाले असून, विहिरी तळ गाठू लागल्या आहेत.

अकोले तालुक्यातील कळंब, मन्हाळे, मुथाळणे, देवठाण, केळी ओतूरच्या वाड्या आणि घोडेवाडी परिसरात दर वर्षीप्रमाणे पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आदिवासी भागातील बहुतांश गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता प्रवरा नदीवरील बंधारे भरण्यात येत आहेत. लाभक्षेत्रातील टंचाईची झळ कमी होण्यास मदत होणार आहे.

भंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी ८३० क्युसेकने, तर निळवंडे धरणातून १,७०० क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीतून लाभक्षेत्राकडे विसर्ग सुरू आहे. आठमाही सिंचन प्रकल्प असलेल्या आढळा धरणात ७२८ दशलक्ष घनफूट इतके पाणी आजमितीस आहे.

मुंबई विभाग उत्पन्न

प्रकल्प क्षमता सध्याचा साठा
शिळवंडी १४३.५५ ८३.४३ 
सांगवी ७१.२३ २९.४३ 
पाडोसी १४६ ७१.६५ 
अंबित १९३ ८९.९९ 
देवहंडी (शिरपुंजे)१५५ ६७.५५ 
बलठण २०२ १०४.२९ 
कोथळे १८२ १०५ 
टिटवी ३०३.३२ १९८.९६ 
बोरी ४७.८० २६.७१ 
बदगी बेलापुर ९४.९८ २९.९३ 
वांकी ११२.६६ ७५.१५ 
पिंपळगाव खांड ६०० २६०.२९ 
*दशलक्ष घनफूट  

विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून. आदिवासी भागातील बहुतांश गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : पन्नास टक्क्यांहून अधिक महाराष्ट्राचे कृषीक्षेत्र झाले कमी; पाच वर्षांत घटली ३.२५ लाख हेक्टर शेतजमीन

Web Title: Water Release: 1,700 cusecs of water released from Nilwande through Pravara River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.