Join us

Water Release In Vidarbha : अमरावती विभागातील 'या' १४ धरणांमधून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:43 AM

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी तीन दारे १० सें.मी.ने उघडण्यात आली. त्यामधून ४७ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. याशिवाय विभागातील अमरावती विभागातील अप्पर वर्धा, बेंबळा आणि पूस या मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४ धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी तीन दारे १० सें.मी.ने उघडण्यात आली. त्यामधून ४७ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. याशिवाय विभागातील अमरावती विभागातील अप्पर वर्धा, बेंबळा आणि पूस या मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४ धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे ५० से.मी.ने उघडले असून, यातून १७२ क्युमेक विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणाचे दोन गेट ३० से. मी.ने उघडले आहेत. या ठिकाणी ४६.११ क्युमेक विसर्ग सुरू आहे.

याशिवाय अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पूर्णा प्रकल्पाचे दोन गेट दहा से. मी. उघडले असून, या प्रकल्पात ४७ क्युमेक, तर सपा प्रकल्पाची दोन गेट पाच से. मी. उघडले आहेत. यामधून ६.७५ क्युमेक विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मिलिमीटर एवढी ठेवण्यात आली आहे.

सध्या ही पातळी ३४१.०९ मिलिमीटर झाली आहे. त्यामुळे जवळपास ७८.५६ टक्के धरण भरलेले आहे. धरणाची दारे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रकल्पांतील पाणीसाठा

अमरावती  विभागातील अनेक शहरे मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. विभागातील एकूण ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८८२.०९ दलघमी म्हणजे ६३.०१ टक्के, २७ मध्यम प्रकल्पांमध्ये ५००.९२ दलघमी म्हणजे ६४.९१ टक्के, तर एकूण २५३ लघु प्रकल्पांमध्ये ४४७.९० दलघमी म्हणजे ४८.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व धरणांमध्ये १८३०.९१ दलघमी (५९.०२ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

...या धरणांमधून विसर्ग

अमरावती विभागातील अप्पर वर्धा, बेंबळा, काटेपूर्णा आणि पूस या मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४ धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. बेंबळा प्रकल्पातून १७२ क्युमेक, पूस प्रकल्पातून ३५.३७ क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे. मध्यम प्रकल्पांपैकी पूर्णा १४.५४ क्युमेक, गर्गा ६९.६२ क्युमेक, अधरपूस ५५. सायखेडा ३९.४६, गोकी ११.१९, वाघाडी २८.२५, बोरगाव ०.६८, घुंगशी बॅरेज ६४, अडाण प्रकल्पातून १०.२४, सोनल ०.१२० आणि सपन प्रकल्पातून ६.७४ क्युमेक विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :जलवाहतूकपाणीअमरावतीविदर्भपाऊसमोसमी पाऊसशेती क्षेत्रहवामान