राज्याच्या विविध भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. यामुळे विविध धरण, नदी, नाले यामध्ये पाण्याची आवक वाढली आहे.
त्यातच राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग.
राज्यात सध्या कोतुळ (मुळा नदी) येथून १०,३४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर भंडारदरा धरण (प्रवरा नदी), निळवंडे धरण (प्रवरा नदी), देवठाण (आढाळा नदी), भोजापुर (म्हाळुंगी), ओझर (प्रवरा नदी), मुळा डॅम (मुळा), गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर (गोदावरी), जायकवाडी (गोदावरी) आधी ठिकाणहून विसर्ग बंद आहे.
यासोबत हातनुर (धरण) १८२२२ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर उर्वरित सिना (धरण) शून्य, उजनी (धरण) शून्य, राधानगरी १५००, राजापूर बंधारा (कृष्णा) १,३५,८३५, कोयना (धरण) १०५०, गोसी खुर्द (धरण) ३,४५,७४८, खडकवासला शून्य, पानशेत शून्य, जगबुडी नदी (कोकण) १३,२५०, गड नदी (कोकण) १,२५,२३९ क्युसेक विसर्ग सुरु आहे.