Join us

Water Release : चंद्रभागाचे तीन, सपनचे दोन दरवाजे उघडले; पहिल्यांदा दोन्ही धरणांतून विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 3:11 PM

मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या देवगावनजीकच्या चंद्रभागा, तर वझर येथील सापन प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने मंगळवारी दुपारी ३ पासून पाच सेंटिमीटरने प्रत्येकी तीन व दोन दरवाजे उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदा दोन्ही प्रकल्पांची दारे एकाच वेळी उघडली.

पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याने मेळघाटच्या पायथ्याशी शहानूर, चंद्रभागा व सापन प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढत आहे. चिखलदरा व परिसरात कोसळणारा पाऊस या प्रकल्पामध्ये येतो. सोबतच नव्याने उभारलेल्या बागलिंगा प्रकल्पातसुद्धा पाणीसाठा भरू लागला आहे. मंगळवारी चंद्रभागा प्रकल्पाची तीन दारे उघडली. त्यातून १५.९४ घनमीटर प्रतिसेकंद पाणी चंद्रभागा नदीपात्रात सोडले जात आहे.

सापन मध्यम प्रकल्पाची तीनपैकी दोन दारे पाच सेंटीमीटरने उघडण्यात आली. प्रकल्पातून ६.७४ घनमीटर प्रतिसेकंद दराने पाण्याचा विसर्ग सापन नदीपात्रात सोडण्यात आला आहे. प्रकल्प ८० टक्के भरला असल्याने प्रकल्प प्रशासनाने हा निर्णय घेतला.

शहानूर साठ टक्के

अंजनगाव व दर्यापूर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहानूर प्रकल्पात ६० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे परिसरातील शेकडो गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

टॅग्स :मेळघाटमेळघाटविदर्भजलवाहतूकपाऊसहवामान