नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयाने आता तळ गाठला आहे. सद्यःस्थितीला प्रकल्पात केवळ १५ दलघमीच जिवंत पाणीसाठा असल्याने हे पाणी मोजकेच दिवस पुरणार आहे. मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाला तरच शहराचा पाणीपुरवठा नियमित सुरू राहील, अन्यथा जून महिन्यात नांदेडकरांना टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, हिंगोली, यवतमाळ व परभणी जिल्ह्यातील लहान-मोठ्या १४४ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५ टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्यात वेळेवर पाऊस न पडल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गेली काही दिवसांपासून तापमानाचा पारा
लोहा तालुक्यात सर्वाधिक ५१ खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केलेले आहे. त्यापाठोपाठ मुखेड ३६ आणि मुदखेड तालुक्यात ३२ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. याशिवाय हिमायतनगर २४, बिलोली १२, नांदेड १०, अर्धापूर ७, भोकर २, नायगाव १८, कंधार २७, किनवट १४ तर माहूर तालुक्यात १५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
वाढत्या तापमानाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने मे अखेर अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचे चटके लागत असून, तापमानाचा पाराही वाढला आहे. त्याचा परिणाम
भूगर्भातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट झाल्याने जिल्ह्यातील २४८ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, २१ गावांत टँकर सुरू करण्यात आले आहे. परंतू मागणी त्यापेक्षा अधिक आहे.
छोटे ७५ प्रकल्प पडले कोरडेठाक
■ नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ११० छोट्या प्रकल्पापैकी जवळपास ७५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
■ मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडला तरच पशु- पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अन्यथा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल.
बहुतांश तालुक्यात विहिरींचे केले अधिग्रहण
लोहा तालुक्यात सर्वाधिक ५१ खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केलेले आहे. त्यापाठोपाठ मुखेड ३६ आणि मुदखेड तालुक्यात ३२ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. याशिवाय हिमायतनगर २४, बिलोली १२, नांदेड १०, अर्धापूर ७, भोकर २, नायगाव १८, कंधार २७, किनवट १४ तर माहूर तालुक्यात १५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.