Lokmat Agro >हवामान > Water shortage : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

Water shortage : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

Water shortage : Farmers are waiting for heavy rains  | Water shortage : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

Water shortage : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

Water level : जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

Water level : जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Water shortage :  जालना जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. चालू वर्षी जिल्ह्यात केवळ पावसाची रिमझिम सुरू आहे. असे असले तरी वार्षिक सरासरीपेक्षा ६६.१३ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. 

दुसरीकडे जिल्ह्यातील १० प्रकल्प आजही कोरडेठाक असून, ४१ प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ २ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ही स्थिती पाहता प्रकल्पांची तहान भागविण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

केवळ कल्याण गिरिजा प्रकल्पात पाणीसाठा केवळ १८.३० टक्के उपलब्ध आहे. त्यामुळे शहरसह ग्रामीण भागात आता चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.  

जिल्ह्यात चालू वर्षी वेळेवर पावसाने हजेरी लावली आहे; परंतु मुंबई, पुण्यासह इतर भागांत दमदार पाऊस पडत असताना जिल्ह्यात केवळ रिमझिम पाऊस होत आहे. परिणामी जिल्ह्यातील काही भाग वगळता इतरत्रच्या नदी-ओढ्यांना अद्याप पाणी आलेले नाही. 

जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी १० प्रकल्प कोरडेठाक असून, ४१ प्रकल्पांत मृतसाठा आहे, तर १३ प्रकल्पांमध्ये केवळ २.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पांतच पाणी आलेले नसल्याने शहरी, ग्रामीण भागातील पाणी प्रश्न अद्याप गंभीर आहे. या प्रकल्पांची तहान भागविण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे.

केवळ कल्याण गिरिजा प्रकल्पात पाणी
• जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी जालना तालुक्यातील कल्याण गिरिजा प्रकल्पात १८.३० टक्के पाणीसाठा आहे, तर कल्याण मध्यम प्रकल्प, बदनापूर तालुक्यातील अपर दुधना प्रकल्प, भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प आणि बदनापूर तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पातही पाण्याच ठणठणाट आहे. 
मोठ्याच प्रकल्पांत पाणी नसल्याने अनेक पाणीपुरवठा योजना बंद असून, गावागावात पाणीटंचाई कायम आहे.

असा झाला पाऊस

तालुका     टक्केवारी
भोकरदन    ६९.११%
बदनापूर                  ६२.३६%
अंबड    ५८.८८%
घनसावंगी                ६०.९२%
जाफराबाद                ६३.७३%
जालना                    ६५.५८%
मंठा                          ६८.७४%
परतूर           ७४.६०%
 एकूण६६.१३%

Web Title: Water shortage : Farmers are waiting for heavy rains 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.