Lokmat Agro >हवामान > उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

Water shut off from Ujani through the canal, how much water is left in the dam? | उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले.

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातीलपाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले.

सध्या उजनी धरणात ५६.१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असून, इथून पुढे पाच महिने पिण्यासाठी पाण्याची गरज भासणार आहे. गतवर्षी याच दिवशी उजनीत एकूण १०३.४० टीएमसी पाणीसाठा होता, तर ७४.१८ टक्के पाणी पातळी शिल्लक होती. इथून पुढे सहा ते सात महिने कालव्यातून पाणी सोडण्याची शक्यता कमीच आहे. हा शेतीसाठी कठीण काळ असणार आहे.

नियोजन कोलमडले..
गतवर्षीचा पावसाळ्यात कमी व अनियमित पर्जन्यवृष्टीमुळे १५ ऑक्टोबरला उजनीत ६०.६६ टक्के पाणी व ९६ टीएमसी एकूण पाणीसाठा झालेला होता. यातील ३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. १ नोव्हेंबर २०२३ रोजी कालवा नियोजन मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार १ नोव्हेंबर २०२३ रोजी कालव्यातून पहिले आवर्तन सुरू झाले.

इथून पुढे धरणाच्या गाळमोन्यातून भीमा नदीद्वारे सोलापूरसह इतर शहरांना दोन पाळ्यांतून पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. - धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा सोलापूर विभाग

कालवा, भीमा सीना बोगदा, सीना माढा व दहीगाव सिंचन योजना यात यापुढे पाणी सोडता येणार नाही, कारण धरणातील पाण्याची पातळी या हंगामात खूपच खालावली आहे. सध्या पातळी खाली गेल्यामुळे भीमा-सीना जोड कालवा व सिंचन योजनांना आजच पाणी पोहोचू शकत नाही. - प्रशांत माने, कनिष्ठ अभियंता, धरण व्यवस्थापक

 

Web Title: Water shut off from Ujani through the canal, how much water is left in the dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.