Water Storage : बीड जिल्ह्यात माजलगाव मध्यम प्रकल्प सर्वांत मोठा असून, त्यावर बीड शहराची तहान भागवली जाते. परंतु, हे धरण सद्यः स्थितीला जोत्याखालीच असल्याने बीडकरांची पाण्याची चिंता कायम आहे. माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले तर बीडकरांना पाण्याची फारशी चिंता राहणार नाही. पुढील सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने धरण पूर्ण भरेल, अशी आशा शेतकऱ्यांसह नागरिकांना आहे.मे अखेरपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर जून महिन्यात चांगला पाऊस सुरू झाला होता. मागील काही वर्षांचा मागोवा घेतला तर जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला नसल्याने यंदा परिस्थिती सकारात्मक दिसून आली नाही. १ ते १२ जून या कालावधीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यावरच शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. अनेक भागात आता कापूस व सोयाबीन उगवला आहे.
पाणी पुरवणारे धरण जोत्याखाली
बीड शहराला पाणी पुरवणारे माजलगाव धरण अद्यापही जोत्याखालीच आहे. धरण क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची आवश्यकता आहे. सप्टेंबर महिन्यात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात परतीचा मोठा पाऊस होतो, त्यामुळे पुढील कालावधीत सर्व धरणे भरतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
महिन्यातही धरणांची स्थिती अद्यापही बिकटच आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात निर्माण झालेला नाही. परिणामी, धरणांतील पाणीसाठा प्रकल्प उपयुक्त साठा खालावलेला आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काळात भयावह पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल की काय, अशी शंका शेतकऱ्यांसह नागरिकांना सतावत आहे. आगामी दोन महिन्यांत चांगल्या पावसाने परिस्थिती बदलेल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे.
धरणांतील पाणीसाठा
प्रकल्प उपयुक्त साठा(दलघमी) टक्केमाजलगाव 0,00 0,00मध्यम ५७.०९५ ३७.६९लघुप्रकल्प ७३.३६४ २९.०७एकूण १५२.५४२ १८.२३
जिल्ह्यात आतापर्यंत किती पाऊस?
* जून, जुलै व १८ ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यात सरासरीच्या ४४३.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.* आतापर्यंत एकूण ७८.४ मिमी पाऊस झाला झाला आहे. पावसाची आकडेवारी अधिक असली तरी पावसाच्या टक्के- वारीनुसार धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
पाटोद्यात सर्वाधिक पाऊसबीड जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक पाऊस पाटोद्यात १००.९ मिमी एवढा झाला आहे. त्यापाठोपाठ आष्टी तालुक्यात ८६.२, अंबाजोगाई तालुक्यात ८२.१, तर शिरुर कासार तालुक्यात ८३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्व तालुक्यांतील ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ७८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील नदी, नाले व बंद पडलेल्या बोअरवेलला पाणी आले आहे.