Join us

Water Storage : जालना जिल्ह्यात केवळ २ टक्के उपयुक्त पाणी साठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 3:03 PM

Water Storage : जालना जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस न झाल्याने येथील जलसाठे कोरडेठाक झाले आहे.

Water Storage : 

पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला तरी जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. आजही १० प्रकल्प कोरडेठाक असून, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ २ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे.आगामी काळात जिल्हाभरात धो-धो पाऊस झाला तरच वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा प्रकल्पांत उपलब्ध होणार आहे.यंदा जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खरिपाची पेरणी पूर्णत्त्वास आली. शिवाय रिमझिम पावसामुळे पिकेही चांगलीच बहरली आहेत. परंतु, जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान अद्याप कायम आहे. एकीकडे प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे १० प्रकल्प कोरडेठाक असून, ४० प्रकल्पांत मृतसाठा आहे. उर्वरित केवळ १४ प्रकल्पांत २.२ टक्के उपयुक्त साठा आहे.  ही स्थिती पाहता आगामी काळात दमदार पाऊस झाला तरच जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

धरणांतील पाणीसाठाप्रकल्प            उपयुक्त साठा (दलघमी)          टक्केकल्याण गि.             १.७७                                     १८कल्याण म.               ००                                        ००अप्पर दुधना              ००                                        ००जुई मध्यम                 ००                                       ००धामना मध्यम              ००                                       ००जिवरेखा                     ००                                       ००

जिल्ह्यात आतापर्यंत किती पाऊस?प्रशासकीय आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात तब्बल ८१ टक्के पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शहराला पाणी पुरवणाऱ्या जायकवाडीत ३१ टक्के साठाउद्योगनगरी जालना शहराला पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. त्या प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

नाशकात पाऊस पडला, तर आम्हाला पाणीजालना शहराला जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होतो. हा प्रकल्प भरला तरच पाणीप्रश्न सुटणार आहे. त्यासाठी नाशिक भागात पाऊस पडणे गरजेचे आहे.

दोन तालुक्यांत ७५ टक्क्यांच्या आत पाऊस जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यात अंबड आणि घनसावंगी तालुक्यात ७५ टक्क्यांहून कमी पाऊस असून, इतर तालुक्यांत ८० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याचे प्रशासकीय आकडेवारी सांगते. 

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीपाणीकपातपाऊस