उजनी धरणातूनरब्बी पिकासाठी कालवा व बोगद्यातून पाणी सोडले. उजनी धरणातील पाण्याचे रब्बी हंगामासाठीचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार फेब्रुवारी २०२४ अखेर रब्बी हंगामात कालवा आणि बोगदा सीना नदी येथून पाण्याची दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे.
यातील पहिले आवर्तन शनिवारी पहाटे पाच वाजता कालव्यातून ५०० क्युसेक तर बोगद्यातून २०० क्युसेक सोडण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता कालवा १००० क्युसेक करण्यात आला. आणखी त्यात टप्पाटप्प्याने वाढ करून कालवा २५००, तर बोगदा ९५० क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.
लाईट बंद न करण्याचा आदेशभीमा-सीना जोड कालवा अर्थात योगदानातून पाणी सोडल्यानंतर शेतीसाठी वीजपुरवठा बंद करू नये, अशी खास मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली होती. त्यांच्या मागणीला पालकमंत्र्यांनी दुजोरा देऊन बोगद्यावरील लाईट बंद न करण्याचा आदेश पारित केला.