Lokmat Agro >हवामान > उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद

उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद

Water will release from Ujani Dam; electricity connection off sina river side villages | उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद

उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद

सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

यासोबत काही गावांमध्ये चोवीस तास वीजपुरवठा खंडित करण्याचे नियोजन असून नियमानुसार तसेच सर्व विभागाच्या नियोजनातून वीज खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

उजनीचे पाणी २१ कोल्हापूर टाईप बंधाऱ्यातून सोलापूरला पाणी येणार आहे. या दरम्यान सव्वाशेहून अधिक गावे लागतात. नदीतून तसेच इतर बंधाऱ्यातून शेतकरी शेतीसाठी पाणी उपसा करतात. प्रत्यक्षात यास कुठलीही परवानगी नसते.

हा बेकायदा उपसा असून शेतकऱ्यांना यापूर्वी अनेकदा समज दिली आहे. परंतु नदीकाठ परिसरातील शेतकरी उजनीचे पाणी चोरतात. यामुळे, सोलापूरला कमी पाणी मिळते. यासाठी प्रशासन वीजपुरवठा खंडित करून बेकायदा पाणी उपसा रोखणार आहे.

तसेच मोटार लावून पाणी उपसा होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मोटारी जप्त करून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या गावांमध्ये केवळ आठ तास वीजपुरवठा होत होता. आता यात कपात करण्यात आली असून बेकायदा पाणी उपसा सुरू राहिल्यास संपूर्ण चोवीस तास वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

या गावांमध्ये होणार वीज खंडित
माढा : कव्हे, शिंगेवाडी, नाडी, मृगशी, वापेगव्हाण, बीटरगाव, अंकुलगाव, रिधोरे, पापणस, नालगाव, महिसगाव, गणेशवाडी, शिराळा, निमगाव, तांदूळवाडी, जामनरा, सुलतानपुरी, वडशिंगे, दारफळ, उंदरगाव, केवड, महनपूर, खैराव, वाकाव, अंजनगाव, खेलोबा, मानेगाव, कुंभेज, लोंढेवाडी, पाचफुलेवाडी.
मोहोळ : बोपळे, अनगर, नरखेड, कुंभेज, पासलेवाडी, गलांडवाडी, खरकटणे, कुरणवाडी, दाईगडेवाडी, रोपळे, बिटले, एकरुके, पासलेवाडी, मलिकपेठ, कोळेगाव, मोहोळ, घाटणे, भांबेवाडी, आष्टे, हिंगणी, निपाणी, शिरापूर, खुनेश्वर, लांबोटी, विरवडे बु., विरवडे खुर्द, मुंडेवाडी, नांदगाव, सावळेश्वर, अर्जुनसोंड, शिगोली, तरटगाव, पिरटाकळी, शिरापूर, तिन्हे शिवणी, हिरज
उत्तर सोलापूर : हिरज, तिन्हे, अकोले, पाथरी, कामती, गुंजेगाव, नंदूर, डोणगाव, समशापूर.
दक्षिण सोलापूर : तेलगाव, वांगी, वडकबाळ, हत्तूर, चंद्राळ, कुमठे, होनमुर्गी, औराद, शिंदखेड, बिरनाळ, अहेरवाडी, बंकलगी, कलकर्जाळ, सांजवाड, मद्रे, राजूर, चिंचोळी, बोळकवटा, बिरनाळ, हत्तूर, हत्तरसंग, सुलेरजवळगे.
अक्कलकोट : कोर्सेगाव, कुमठा, कुडल, मुंढेवाडी, धारसंग, चिंचोळी.

Web Title: Water will release from Ujani Dam; electricity connection off sina river side villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.