राज्यात आज वादळी पावसासह उष्णतेचा कहर पहायला मिळणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले. राज्यात बहुतांश भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटांसह गारपीटही झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तापमानाच्या उच्चांकी आकड्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
चक्राकार वारे कुठे सक्रीय?
चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर पाकिस्तान व परिसरात सक्रीय असून वेस्टर्न डिर्स्टबन्स वायव्य भारतात तयार होत आहे. मराठवाड्यावर चक्रीय वाऱ्यांच्या विस्कळीत साखळीमुळे आज व उद्या मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तापमानाचा उच्चांक
दरम्यान काल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तापमानाचा उच्चांक पहायला मिळाला. विदर्भात २ ते ४ अंशांने तापमान वाढले होते.आज मध्य महाराष्ट्र, नैऋत्य भागासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींचा पाऊस येण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा- एकीकडे गारपीट तर दुसरीकडे सहन न होणारा उकाडा कशामुळे?
कुठे देण्यात आला यलो अलर्ट
धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ