Join us

उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी, तर उर्वरित राज्यात असे असेल हवामान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 6:32 PM

पुढील पाच दिवस राज्याचे हवामान (Weather alert) कसे असेल हे जाणून घेऊ या, हवामान शास्त्रज्ञांकडून...

माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ (से.नि)

मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजी नगर, जालना ह्या ११ जिल्ह्यात  सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यंत पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १०-१२ डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकतात 

मुंबईसह कोकणात सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यंत पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान  वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असेल. 

विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यंत पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १४-१६ डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक दरम्यानचे असू शकतात. 

विदर्भात २३  जानेवारी नंतर ३ दिवसासाठी म्हणजे २५ जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही.(लेखक भारतीय हवामान विभाग, पुणे येथील निवृत्त हवामानशास्त्रज्ञ आहेत)

टॅग्स :हवामानतापमानशेतकरी