Join us

Weather and Monsoon : वाऱ्याचा शिअर झोन म्हणजे काय माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 9:17 PM

वातावरणात प्रचंड घडामोडी घडत असतात.

वातावरणात प्रचंड घडामोडी घडत असतात. आकाशात किंवा वातावरणात घडणाऱ्या घडामोडींवरून हवामानात बदल होत असतात.  वातावरणीय बदलामुळे पावसाची किंवा मान्सूनची स्थिती समजते. त्यावरून अनेक निर्णय घेण्यास किंवा उपाययोजना करण्यासाठी फायद्याचे ठरते.

मान्सूनच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत असताना बऱ्याचचा वातावरणीय घटना आपल्याला समजत नाहीत. किंवा अवकाशात होत असलेल्या घडामोडींबद्दल आपल्याला माहिती नाही. त्याचप्रमाणे वाऱ्याचा शिअर झोन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का? जेष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली माहिती खालीलप्रमाणे...

जमिनीपासून मध्य तपांबर (ट्रोपोस्फेअर) पर्यन्त  ३ ते ६.५ किमी दरम्यानच्या उंच अशा साडे तीन किमी. क्षेत्र हवेच्या जाडीत, कमी दाब क्षेत्राचा, जर पूर्व पश्चिम आस तयार झाला व त्याच्या वरच्या पातळीत पूर्वेकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खालच्या पातळीत पश्चिमेकडून - पूर्वेकडे उंचावरील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांच्या स्थितीला 'हॉरीझोन्टल शिअर झोन' म्हणतात.

वाऱ्याचा शिअर झोन हा अक्षवृत्ताला समांतर असतो. त्याचबरोबर जसा आडवा म्हणजेच अक्षवृत्ताला समांतर शिअर झोन असतो त्याचप्रमाणे 'व्हर्टीकल शिअर झोन'सुद्धा असतो.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान