राज्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. विदर्भात २३ व २४ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये थंड वारे वाहत आहेत. दरम्यान राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वायव्य अरबी समुद्र आणि महासागराच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर चक्राकार वारे घोंगावत असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.
मराठवाड्यातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढता..
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
विस्तारित अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक २० ते २५ जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याचा अंदाज आहे. दिनांक 26 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.