राज्यात कालपासून जोरदार पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या कर्नाटक, तमिळनाडू पासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणमी राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून ढगाळ वातावरणासह उन्हाच्या झळा कायम असून उकाडा असह्य झाला आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला होता. ४० ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान गेल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत होता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसासह गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यलो अलर्ट कुठे?
धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, जिल्ह्यात पाऊस व गारपीटीची शक्यता असून यवतमाळ व अमरावती जिल्ह्यास उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.