Join us

Weather Forecasting : हवेत फुगा सोडून २५ किमी उंचीवरील हवेतील घडामोडी कशा मोजल्या जातात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 5:59 PM

Weather Updates : हवामानाचा अंदाज देण्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यातीलच एक म्हणजे हवेत फुगा सोडून जवळपास २५ किमी उंचीवरील वातावरणातील घडामोडींचा अभ्यास करणे होय.

Weather Forecasting Process : हवामान विभागाकडून सातत्याने हवामानाचा अंदाज दिला जातो. वातावरणातील घडामोडी, पावसाचा अंदाज, थंडी, तापमान, वारे, कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळे आणि वातावरणातील सर्व गोष्टींची अद्ययावत आणि अचूक माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येते.

हवामान विभागाच्या अंदाजासाठी वेगळी यंत्रणा काम करत असते. खूप वर्षांपासून वेगवेगळ्या यंत्राच्या माध्यमातून हवेतील वेगवेगळ्या घडामोडींचा अभ्यास केला जातो. त्यानुसार हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो आणि या अंदाजावर अभ्यास करून शेतकऱ्यांना फायद्याचा कृषीसल्ला दिला जातो. 

हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या उंचीवरील तापमान, वातावरणातील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, ढग, मातीचे तापमान या सर्व बाबींची अद्ययावत माहिती असावी लागते. तर वैमानिकांसाठी आणि हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरणाऱ्या वरच्या थराची माहिती. (Upper Wind Deta Measurement Process)

https://www.facebook.com/share/v/gnVWi5FaREsvKsPP/?mibextid=qtnXGe

हवामान विभागाकडून यासाठी गॅस भरलेला फुगा आकाशात सोडला जातो. त्या फुग्याला एक यंत्र बांधले जाते, जे आकाशातील सर्व डेटा जमीनीवर पोहोच करेल. हा डेटा घेण्यासाठी हवामान विभागाच्या कार्यालयामध्ये रडार बसवलेले असते. ते रडार सर्व डेटा कॉम्प्युटरवर दाखवत असते. जसाजसा फुगा वर जात राहील तसातशी प्रत्येक सेकंदाची माहिती खालील यंत्राकडे पोहोचत असते. 

data receiving process

कशी असते प्रोसेस?सर्वांत पहिल्यांदा Radiosonde मशीन तयार केली जाते. या मशीनध्ये सन्सॉर बसवलेले असतात. जे सेन्सॉर २० ते ३० किमी उंचीवरील माहिती खाली पाठवत असतात. ही मशीन सर्वांत सुरूवातील सुरू करून साऊंडिंग मशीनशी कनेक्ट केली जाते. त्यानंतर फ्रीक्वेन्सी मॅच झाल्यनंतर कॉम्प्युटरवर डाटा दिसायला सुरूवात होते. दरम्यान, दुसरीकडे मोठ्या फुग्यामध्ये गॅस भरून तयार केले जाते आणि त्या फुग्याला हे यंत्र बांधून हवेत सोडले जाते. हा फुगा जवळपास ३० किमी उंचीपर्यंत वर जाऊ शकतो. त्याचबरोबर Radiosonde मशीन प्रत्येक सेकंदाला वाऱ्याची दिशा, उंची, वाऱ्याचा वेग, तापमान, हवेतील आर्द्रता, ढग या सर्व गोष्टींची माहिती खाली पोहोचवते. 

दरम्यान, या सर्व माहितीच्या आधारे वैमानिकांसाठी विमाने उडवण्याच्या मार्गावरील धोक्यांचा अंदाज दिला जातो. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २५ ते ३० किमी उंचीवरील तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा, आर्द्रता या गोष्टी समजतात. या सर्व बाबींचा हवामानाचा आणि पावसाचा अंदाज देण्यासाठी मोठा उपयोग होतो.

माहिती संदर्भ - IMD Observatory, College of Agriculture Pune

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊस