Join us

Weather:नवीन वर्षात हवामान विभागाने वर्तवली पावसाची शक्यता, काय आहे अंदाज?

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 31, 2023 11:08 AM

तापमानात येत्या २४ तासांत २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता...

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण अरबी समुद्रात येत्या ४८ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून राज्यात नव्या वर्षात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय किमान तापमान येत्या २४ तासांत २ ते ३ अंशांची वाढ होणार असून त्यानंतर तापमानावर फारसा परिणाम दिसत नसल्याचे हवामान विभागाने नोंदवले.

कोकण, गोवा परिसरात ३ ते ६ जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात ५ व ६ जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

नवीन वर्षात कसे असणार तापमान?

दरम्यान, आज नाशिक जिल्ह्यात १३.८ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमान १५ अंश होते. हे सामान्य तापमानाच्या तुलनेत ४ अंशाची वाढ असल्याचे हवामान विभागाने नोंदवले. जळगावात १४.३ अंश तापमानाची नोंद झाली.

काय आहे आजचे तापमान?

Station

Max Temp (oC)

Min Temp (oC)

Ahmednagar

29.9 (30/12)

NA

Aurangabad

30.0 (30/12)

15.0

Beed

30.0 (30/12)

NA

Dahanu

32.1 (30/12)

19.1

Harnai

32.6 (30/12)

23.2

Jalgaon

31.7 (30/12)

14.3

Jeur

32.5 (30/12)

NA

Kolhapur

31.2 (30/12)

16.9

Mahabaleshwar

28.8 (30/12)

15.2

Malegaon

29.2 (30/12)

15.2

Mumbai-Colaba

32.6 (30/12)

22.2

Mumbai-Santacruz

32.9 (30/12)

20.0

Nanded

28.8 (30/12)

17.0

Nasik

31.5 (30/12)

13.8

Osmanabad

31.0 (30/12)

17.0

Panjim

35.4 (30/12)

22.0

Parbhani

30.0 (30/12)

15.5

Ratnagiri

34.6 (30/12)

20.1

Sangli

31.2 (30/12)

15.5

Satara

31.2 (30/12)

13.9

Sholapur

33.0 (30/12)

17.9

Thane

32.8 (30/12)

NA

Udgir

31.2 (30/12)

15.7

दाट धुक्याची शक्यता

उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील अनेक भागात दाट धुके पडेल, असा  इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्व भारतातही पसरू शकतो. IMD ने रविवारी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली होती.काही ठिकाणी हे दाट धुके ४ जानेवारीपर्यंत राहील, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :तापमानहवामानपाऊस